Wednesday 22 June 2011

शिवराज्याभिषेक सोहळा २०११


                     शिवराज्याभिषेक सोहळा २०११


                                                       ओळख -- निलेश पाटील    रा. जळगाव

                            नमस्कार , मी निलेश पाटील , शिवराज्याभिषेक सोहळा २०११ साठी रायगडावर उपस्तीत होतो. त्यावर थोड लिहित आहे,तसा काही अनुभव लिहिण्याची हि माझी पहिलीच वेळ आहे तरी जर काही चुकल असेल तर क्षमा असावी.
                           दि. ३ जून २०११ ,असाच त्या रात्री काम आटपून आम्ही ३ मित्र अशेच गप्पा करत होतो, मधेच शिवरायांचा विषय निघाला त्या वर तिघेही बोलत असताना मी असाच शिवराज्याभिषेक दिनाचा विषय काढला,त्यावर ते दोघ म्हटले हो तो तर आता आहे ना ६ तारखेला मग मी लगेच बोललो नाही तो तारखेवरून आहे पण खरा शिवराज्याभिषेक १३ जून ला आहे हा सोहळा तिथी वरून आहे. मग माझ्या मनात अचानक माझे मित्र राजेश खिलारी ह्यांच्या मागच्या काही वर्षांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या फोटोस ची आठवण झाली, मी लगेचच माझ्या मित्रांना म्हटलो कि रायगडावर खूप मोठा कार्यक्रम असतो शिवराज्याभिषेक दिनाचा मी जाणार आहे ह्या वर्षी तुम्हाला यायचं का तर त्या दोघांनी हि होकार दिला. मग काही दिवसांपर्यंत आम्ह्ची भेट नाही झाली.
                                                     दि. ९ जून २०११,
ला मी त्यांना फोने करून विचारले कि चालायचं ना तर त्यांनी हो सांगितलं व मग मी रायगडावर जय्साठी रेल्वे व बस दोघांची शोधाशोड करायला लागलो मग ह्या ठिकाणी मला माझे मित्र राजेश सर ह्यांची मदत झाली त्यांनी मला सांगितले कि कार्यक्रम भल्या पाहते सुरु होतो त्या नुसार तुम्ही उपस्तीत राहा. त्यांच्या मार्गदर्शनाने मी सगड ठरवले नंतर मी मुंबई कडे ट्रेन्स शोधल्या असता साग्द्या ट्रेन्स फुल होत्या.मग मी थोडा हताश झालो पण शिवरायांना भेटण्याची इच्छा होती मनात परत  मग मी पुण्या कडून यायचं ठरवलं..तसा हा प्रवास लांबचा होता पण आम्हाला काही फरक पडत नव्हता कारण सोहळा आमच्यासाठी जास्त महत्वाचा होता मग मी private बस ने  reservation  केले. आता सगड ठरलं होत.
                                                    दि. ११ जून २०११,
दिवसभर सगडी तयारी करून आम्ही संध्याकाळी ७.वा वरणगाव ह्या ठिकाणी पुण्यासाठीच्या बस ची वाट पाहू लागलो ८ वा. बस मध्ये बसून आम्ही पुण्यासाठी निघालो मनात शिवरायांविषयी आणि रायगड किल्या विषयी हूरहूर माजली होती. सोहळा कसा होत असेल कशी असेल माझ्या राज्यांची राजधानी कसा होईल माझ्या देवाचा राज्यभिषेक कशी असेल माझ्या महाराजांची प्रतिमा असे असंख्य प्रश्न मनात येऊन गेलेत.
                                                   दि १२ जून २०११
पहाटे सकाळी ६:३० वा आम्ही पुणे स्टेशन वर पोहोचलो तिथून आम्ही एसटी स्तानाका ला पोहोचलो आता महाड बस ७:३० वा होती म्हणून मग आम्ही बस ची वाट बघत होतो तसेच काहीवेडात बस आली आम्ही त्यात चढलो जागा तशी छानच मिडली आम्हाला प्रवास सुरु झाला गाडी पुण्याच्या पुण्याच्या बाहेर आली आता खरा निसर्ग डोळ्यासमोर होता समोरचा एका डोंगरावरून पडणार धबधबा तो हिरव्या शालुने सजलेला डोंगर पाहून मन प्रसन्न होऊन गेले. काही वेडा नंतर एका बोगद्याजवळ काही मुल व मुली बीकेस वर फोटोस काढत होते. त्यांना पाहून  मनात विचार आला कि किती चं झाले असते जर आपणही बीके वर आलो असतो, मग दुसऱ्याक्षणी दुसरा विचार आला कि महाराज्यांची भेट महत्वाची आहे ह्या साग्द्या पेख मग दुसर्या विचार पुढे पहिला विचार दुबळा ठरला  कारण विषय माझ्या शिरायांचा होता नि त्यांच्या शिवाय  माझ्यासाठी काहीच महत्वाच वाटत
नसते.आता गाडी पुढे चालत असताना अजून एक दृश्य डोळ्या समोर आले, एक मुलगा शिवरायांचा फोटो असलेला टी shirt घालून हातात मशाल घेऊन धावत होता गर्व वाटला मला कि आजही माझ्या शिवरायान्विषयी इतका आदर आहे लोकांच्या मनात आजही मावळे राज्यांसाठी प्राण त्यागू शकतात.
आता गाडी घाटाच्या रस्त्यातून चालत होती सुंदर देखाव्यांनी मन प्रसन्न होत होते ढगात चालणारी गाडी वळणाचा रस्ता हे सर्व पहिल्यांदाच पाहत होतो मी मनात विचार यायचे हे सागडे इतके सुंदर आहे तर माझ्या राज्यांची राजधानी कशी असेल. गाडी १२.३० च्या दरम्यान महाड बस स्तानाकावर आली.आता विचार पक्का होता साकडी कार्यक्रमाला वेदेवर हजार राहायचं असेल तर पाचाड मध्ये रात्री थांबणे महत्वाचे होते. म्हणून मग एक private  जीप ने आम्ही पाचाड गावाकडे निघालो सोबत  २ मुले वा २ मुली होत्या कदाचित मुंबईचे होते ते , गाडी पाचाड कडे चालू लागली मुसळधार पाउस त्या वेळी अनुभवायला मिळाला गाडी घातासारख्या रस्त्यात चालत होती,अचानक माझी नजर समोर बसलेल्या मुलीच्या अंगठीवर गेली नि इत्क्यावेडा अबोल असलेला मी पटकन बोललो ताई हे अंगठी कुठून घेतली त्या म्हटल्या कि ठाण्यावरून घेतली, परत विचारलाच टी राजमुद्राच आहे ना ती त्यावर त्यांनी मला होकार दिला मग मनात विचार झाला कि मला पण घ्याची आहे राजमुद्रा असलेली अंगठी. मग आमच्यात थोडा संवाद झाला त्यांना विचारले असत ते रोपवे ने जाणार असल्याच समजल. पाचाड गाव आले, मग आम्ही उतरलो त्यांनी आम्हाला विचारले कि तुम्ही गड चढत येणार आहात काय आम्ही म्हटलं हो , नि उतरताच मग नजर समोर असलेया डोंगरात माझ्या राज्यांची राजधानी शोधायला  लागली,पण कदाचित लांबून गडाचा पाय्थाच दिसत होतो परत मनात किल्या विषयी असंख्य प्रश्न मनात येऊन गेलेत. एका पाचाड रहिवाश्याला विचारून आम्हाला खोली मीडाली.
खोलीत light  , fan ची सोय नव्हती मग परत मनात ठरवलं कि प्रकाश आणि हवा तर रोजच अनुभवतो आज शिवरायांसाठी आज अंधार देखील अनुभवायचा. थोड्या वेडात बर्फासारख्या थंड पाण्याने अंघोळ करून आम्ही परत बाहेर पडलो शेजारीच नजरेस एक प्राचीन वस्तू दिसत होती जावड गेले असता जीजामातांचा वाडा असल्याच समजल पाऊस जोरात सुरु होता तसेच आम्ही पावसात वाड्यात शिरलो वाड्याची अवस्ता तितकी बरी नव्हती. एक एक ठिकाण बघत आम्ही वाडा फिरू लागलो आमचाच अंदाज बांधत एक एक ठिकाणाला नाव देत चालत होतो.पूर्ण वाडा फिरून बाहेर पडलो मग परत खोली वर आलो जाम भिजलो होतो आम्ही तश्याच भिजलेल्या कपड्यांनी खोलीत शिरलो
तिथे खोली मालकांना एक light ची सोय करायला लावली
तिथे काहीवेळ  आराम करून रात्री जेवणासाठी निघालो पाऊस आता थांबला होता. एका हॉटेल मध्ये जेवणास बसलो mobile आणि कॅमेरा ला चार्जिंग करायला लावला. शेजारीच असलेल्या दुकानात आम्ही एक एक गोष्ट बघायला लागलो, तेव्हा एका अंगठीवर नजर गेली, आणि मी पटकन त्या अंगठीला उचलून बोटात टाकली ह्या अंगठीवर राजमुद्रा होती. मी पैसे दिले आणि गाडीतील अंगठीचा क्षण मला आठवला. आता जेवण आटोपून अर्धवट चार्गे झालेला कॅमेरा व फोने घेऊन परत खोलीत आलो खंत होती कॅमेरा फुल चार्गे ना झाल्याची, खोलीत शिरलो आता साकडी ३वा. उठायचे होते म्हणून मग मित्रांना सांगून झोपलो.
                                                       दि १३ जून २०११
अचानक जग आली घड्याला कडे पाहिलं असता पाहतेचे ३ वा होते. मी उठलो मित्रांना हि जागी केले.
भल्या पहाटे आन्घोड केली आणि तयार झालो. आता तिघे खोली बाहेर पडलो रस्त्याने गाड्या येत जात होत्या. बाहेर सर्वत्र काळोख होता आता आम्ही पाचाड गावापासून रस्त्याला लागलो रस्ता वळणाचा होता ३:४५ वा. असतील तेव्हा, मग आम्ही मोबिले च्या टोर्च च्या मदतीने चालायला लागलो रस्ता चढ असलेला होता म्हणून लगेच दमलो आम्ही त्यातून अंधार होता वाहनाच्या light  च्या मदतीने आता पुढे चालत होतो काही वेद चला नंतर गडाच्या पायथ्याशी पोचलो. गर्दी होतीच तिथे मग trekking group प्रतिनिधींच्या सूचना एकात होतो आम्ही मग ४.३० वा गड चढायला सुरुवात केली गडाच्या पहिल्या पायरी वर मी डोके टेकून वंदन केले आणि विचार केला कि कदाचित इथ माझ्या राज्यांच्या पायाच स्पर्श झाला असेल. मग जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत आम्ही गड चढू लागलो. थंड हवा सुरु होती मन प्रफुलीत झाले आणि आम्ही पुढे चालू लागलो. पायऱ्या चढताना दम लागायचा पुढे लगेच अपत पाय वाट असायची थोडा थकवा दूर देखील व्हायचा.तसे आम्ही पुढ चालत होतो.आमच्या सोबत group देखील चालतच होते. थोड्या थोड्या अंतराने थांबत होतो.काळोखात किल्ला चढण्याची मजक काही और असते ह्याचा अनुभवव येत होता.एका कडेला डोंगर आणि दुसर्या कडेला खोल दरी होती ह्याची देखील जाणीव होतीच आम्हाला तसे आम्ही सांभाळून चालत होतो, एका ठिकाणी एका दगडाची ठेच मला लागली वा माझा तोल गेला व मी दरी कडे घसरलो प्रयत्न करून स्वताचा तोल सांभाळला. माझे मित्र घाबरलेत.मग परत टोर्च च्या मंद प्रकाशात आम्ही पुढे चालत होतो. एका ठिकाणी पाण्याचा खूप आवाज येत होता जणू पाणी उंच जागेवरून खाली येत होते. थोडे पुढे गेले असता एक चान  असा घाबधाबा होता. वाटत होत कि अंघोळ करावी तिथे पण कपडे नसल्या मुले आमची इच्छा इच्छाच राहून गेली. पुढे पायर्या चढत असताना कानावर ताश्यांचा आवाज पडला मागून येत होता तो आवाज थोड्या वेडातच तो ताश्यांचा गट आमच्याजवल आला. आम्ही उत्साहित होऊन नाचू लागलो जय भवानी जय शिवाजी घोषणा देत होतो आणि आमच्या मग्न आलेला ग्रौप आमच्या पुढे निघून गेला मनात विचार केला कि हे लोक आपल्या मागून आलेत नि आपल्या पुढे गेलेत देखील मग आम्हीही उत्साहाने पुढे चालू लागलो.
आता जवळपास १ तास चालून झाला होता मनात लवकरात लवकर किल्यावर पोचायची ओढ लागली होती. आता रायगडाच्या प्रवेश द्वाराजावड आम्ही पोचलो.अजूनही अंधार होताच पण मंद प्रकश त्या अंधारातून वाट करत होता. आता खरी प्रसनता वाटत होती संधान होत कि प्रवेश द्वारा जावड पोचलो, आत शिरलो परत पायऱ्या होत्या चालत होतो  किल्ला चढत होतो, सोबत काही वयस्कर बाया वा माणसे हि उत्साहाने गड चढत होते मनात खूप आनंद होता आता काहीवेडात आम्ही वर पोचलो पालखी निघालीच होती नुकती, आम्ही धावतच पालखी जावड पोचलो.पोचताच तिथे लोकांची गर्दी दिसली. हा खरा मराठा समाज एकवटलेला पहिला खूप मोठा जन समूह होता. पालखी जवळ येऊन आम्ही राज्यांना मानवंदना केली महाराज्यान कडे बघतच राहावं अस वाटत होत पण ते शक्य नव्हते. लोक उत्साहात बुडाले होते.लोकांचा उत्साह बघण्याजोगे होता
असा काही सोहळा आजही होतो ह्याची आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती.पाऊस येताच होता किल्ला धुक्याने झाकलेला होता. शेजारीच  शिवराय सिंव्हासंवर विराजमान होते त्यांच्या कडे गेलो. राज्यांना आदरांजली दिली. त्यांच्या पायावर मस्तक टेकले. त्यांना वंदन केले. राज्यांची प्रतिमा बघून मन भरून गेले. अस वाटत होत कि राजे स्वताच बसलेलं आहेत आणि आज्ञा करत आहेत. शेजारीच तंबू होते कदाचित तिथे रात्री मुक्काम केला असेल लोकांनी. तिथून राज्यांचे रूप डोळ्यात घेऊन पुढे जाऊ लागलो आता आम्ही पालखी सोबतच चालत होतो जल्लोषाच जल्लोष होता आम्ही हि जल्लोषात सामील होतो. सर्वत्र हवेत भगवे लहरत होते .लोक पारंपारिक वेशात होते आमचा सगडा थकवा जणू उत्साहात बदललेला होता. इतका आनंद मला खरच कधीच झाला नव्हता. खूप खूप आनंद होत होता
असाही आपुला काही सोहळा होतो हे आधीतर माहित नव्हते पण आता ते प्रतेक्षात बघतोय रायगड कल्पनेपेक्षा खूप सुंदर होता.
पालखी आता नागरखाणया जवळ  येऊन थांबली. लोकांनी पालखी खांद्यावर धरली होती. मला सुद्धा वाटत होत कि मला हि तो बहुमान मिळायला हवा. पण कदाचित तितके माझे बघ्या नसावे. पुढे काही मान्यवरांनी वा ह्या सोहळ्याच्या आयोजन समिती द्वारे खूप मोठ्या उंचीवर भगवा फालाकावाला गेला. हा खरा आनंदाचा क्षण असतो एका मराठ्यासाठी जेव्हा भगवा फलक्तो.तो भगवा इतक्या उंचीवर होता कि मान वरून करून बघावं लागत होत. आणि कदाचित तो तेच शिकवत देखील होता कि, आजही मराठा मन उंचाकारूनच जगतो. आता पालखी पुढे चालत होती पालखी पुढे मशाल घेऊन तलवार घेऊन लोक चालत होते.हे क्षण कधी विसरता येणार नाहीत मला, आता पालखी नगारखान्यातून आत शिरली सगडा जनसमूह राजदरबारात शिरत होता माझी एकाच धडपड होती कि मला जास्तीत जास्त फोटोस क्लीक करायचे होते म्हणून मी पालखीच्या पुढच राहत होतो पालखीचे सुरक्षा रक्षक मला  हाकलत होते पण तरी हि मला डोळेभरून राज्यांना पहायचे होते . आता पालखी पुढे सरकत होती. जनसमूह खूप मोठा जमलेला होता. अभात अश्या जनसमूहात मी आता माझ्या मित्रांपासून वेग्दा झालो होतो मला माहित नव्हत कि ते कुठे गेले आहेत. मी एकटाच होतो आता पण मला क्षणभर हि वाटले नाही कि मी एकता आहे. हा माझा हजारोने जमलेला परिवाराच वाटत होता मला. पालखी  थांबली. आता सगडे मेघ दंबरी जवळ आलेत.मी हि अगदी समोरच उभा होतो. गर्दीत नीटसं दिसत नव्हत. आता राज्याभिषेक विधी सुरु झाला. उपस्तीत मान्यवरांनी विधी सुरु केला. तस्मे कुअलाच ओळखत नव्हतो म्हणून मान्यवर कोण आहेत हे माहित नव्हते मला पण त्यांच्या बद्दल खूप आदर वाटत होता कि ते ह्या ठिकाणी किती उत्शाने उपस्तीत आहेत ,अर्थात माझ्या इतकाच त्यांना देखील अभिमान असेलच शिवरायांचा,पण त्यांचा वाट नक्की खूप माथा आहे शिव्कार्यात माझ्यापेक्षा. ह्या सगड्या आयोजकांना मी मनात धन्यवाद करत, विधीला कुतूहलाने पाहत होतो. पाऊस मुसळधार होता. पण हा पाऊस एकही मराठ्याला हळू शकला नाही. कारण प्रत्येकाला हा सोहळा जिवापेक्षा जास्ती होता, सागडे भिजत होते, मधूनच लोकंच्या घोषणा सुरु होत्या, जय भवानी जय शिवाजी.... ह्या घ्ष्ण आणि त्यांचा प्रतीसाठ खरच खूप उत्साही होता.आता विधी सुरु होता राज्यांवर पंचामृताचा अभिषेक होत होता हे सगळे अप्रतिम होते. थोड्याचावेडात  शेजारी  मर्दानी खेडांचे प्रदर्शन सुरु झाले. मग थोदुअवेदत विधी संपन्न झाला. राजे सिव्हासानावर विराजमान झालेत . लोकांमध्ये जल्लोष सुरु झाला आम्हीही जल्लोषात सामील झालो. नाचलो खूप वाटत होत दिवाळी दास्र्यापेक्षा मोठा क्षण होता हा.पारंपारिक वेशात आलेले लोक,लहान मुले, तलवारी घेऊन आलेले मंडळ, लेझीम खेड्णारी मंडळी,मंडपात नाचत होते. आम्ही पण सामील झालो होतोच त्यांच्यात, आता मित्र सुद्धा मला शोधात आले होते, आता मर्दानी खेळ पाहायला जमलो आम्ही लहान लहान पोर तलवारींचे खेळ करताना दिसत होती हे खरच खूप चं होत, इथ काहीवेळ थांबल्या नंतर आम्ही परत मंडपात आलो इथे लेझीम खेळणाऱ्या  मुले वा मुले होते उत्साहात लेझीम खेळत होते. आता राज्यांना परत पालखीत बसविण्यात आले. आम्ही लगबगीने मेघ दंबरी जवळ राज्यानला मस्तक टेकून वंदन केले अलोट मी मेघ दंबरीत विराजमान राज्यांकडे पहिले पण कशांत मी घाबरलो राजे जणू माझ्यावर रागावत होते त्यांच्या डोळ्यात पहायची हिम्मत होत नव्हती. मला समजताच नव्हते कि अस होतंय काय, माझ्याडोल्यातून अश्रू आलेत मी रडायला लागलो, मनातल्या मनात माफी मागत होतो महाराज्याची, कडत नव्हते कि मी का रडत होतो , आजही कडत नाही कि मी का रडत होतो तेव्हा राज्यांना इतका आक्रमक कधीच पाहिलं नव्हत मी.आता राज्यांना परत वंदन करून मी निघालो. मी आता किल्ला पाहायला निघालो थोड्यावेळाने किल्याचा काही भाग पहिला त्यात राणी महालाकडे गेलोत तिथून पालखी दरवाजा पहिला, सागडे पाहून परत आम्ही पालखी सोबत आलो. आता खूप उत्साहात सगळे नाचत होतो.उत्साह मनवत होते, हे सगडे अप्रतिम होते. पालखीजवळ जाऊन मी शिवरायांच्या पायाला स्पर्श करायला पुढ गेलो पण सुरक्षा रक्षणे मग केल, तिथे एक मान्यवर होते कदाचित उपनगराध्यक्ष होते महाडचे त्यांना विनंती केली असता त्यांनी आम्हास शिवचरण स्पर्श करायला परवानगी दिली मी त्यांचा आभारी आहे,
मग आता पालखी पुढ जाऊ लागली होळी मैदानात येऊन परत लेझीम खेळ पाहायला मिळाले, पुढे बाजारपेठेत पालखी गेल्यावर मला अचानक एका रुबाबदार तरुण पारंपारिक वेशात दिसला मी फोटो काढायला पुढे गेलो तसेच लक्षात आले कि हे तर राजेश सर आहेत ज्यांना माझी नजर सुरुवाती पासून शोधात आहे ,लगेच त्यांच्या जावड जाऊन मी त्यांना ओळख दाखवली त्यांना हि आनंद झाला कि त्यांच्या सांगण्यावरून मी रेगाडावर आलो. त्यांनी मला विचारपूस केली राहण्याविषयी, तिथून ते परत पुढे गेलेत, हे आमची पहिलीच भेट होती, पुढे आता आम्ही पालखीच्या  पुढे चालून आता जाग्दिशेश्वर -मंदिरा कडे गेलो शिव पिंडाचे दर्शन घेऊन आम्ही शिवरायाच्या समाधी कडे गेलो तिथे शिवरायांना वंदन केले, तिथून परत निघालो.
आता दुरून दिसणाऱ्या टकमक टोकाकडे जायला निघालो काही वेडात उत्साहाने टकमक टोकाकडे गेलो तिथून परत काहीवेडा होळी मैदनावर येऊन थांबलो तिथ परत शिवरायांना वंदन करून खाली जिल्हापरिषद च्या रूम मध्ये मिळत असणारा प्रसाद घेतला आणि परत गड उतरायला निघालो काही वेडा गड उतरून आम्ही पाचाड गावात आलो तयारी करून परत महाड कडे निघालो .............................

हा प्रसंग माझ्या जीवनातील अप्रतिम अनुभव आहे हे सगडे फक्त मला राजेश खिलारी सरांमुळे पाहायला मिळाले आणि आता मी जो वर जिवंत आहे तोवर रायगडावर  येईल हे ठरवलं आहे. आणि आता जालगाव वरून सुद्धा मोठा जन समूह ह्या सोहळ्याला पुढच्या वर्षी येतील ह्या साठी प्रयत्न शील राहील. मी शपथ खातो कि शक्य होईल तितका शिव कार्य करेल.

मी राजेश सर आणि शिवराज्याभिषेक सोहळा आयोजन समितीचा खूप आभारी आहे कि ज्यांनी असा कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला. मी   शिवराज्याभिषेक सोहळा आयोजन समितीचा खूप ऋणी आहे. कि त्यांच्या मुले आम्हाला ह्या  सुंदर कार्यक्रमाला यायला मिडाले. मी सर्व उपस्तीत मान्यवरांचा हि ऋणी आहे कि त्यांनी आपला उत्साहाने ह्या कार्यक्रमात सहभाग दिला.
धन्यवाद ..........